कुडाळ : भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणीला सुरुवात झाली असून कुडाळ तालुक्याच्या सदस्य नोंदणीच्यावेळी भाजप कार्यालय येथे बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
भारतीय जनता पक्षाच्या सभासद नोंदणीला सुरुवात झाली आहे या सभासद नोंदणी अभियानामध्ये कुडाळ तालुक्याने मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी करायला सुरुवात केली आहे या नोंदणीचा आढावा घेण्यासाठी बंदर विकास मंत्री नितेश राणे कुडाळ येथे भाजप कार्यालयात आले होते त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला कार्यकर्त्यांना सभासद नोंदणी बाबत माहिती दिली. जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्याबाबत सूचना केल्या. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, प्रदेश सदस्य बंड्या सावंत, सरचिटणीस रणजीत देसाई आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.