भाजपा किसान मोर्चाच्यावतीने सिंधुदुर्गात 'ग्राम परिक्रमा यात्रा' !

वेंगुर्ले तालुक्यातील अणसुर गावातून होणार प्रारंभ
Edited by: दिपेश परब
Published on: February 15, 2024 10:58 AM
views 138  views

वेंगुर्ला : आज संपूर्ण विश्वात मोदींचा विश्व गुरु म्हणून डंका आहे. यामागे मोदी यांची अहोरात्र मेहनत तर आहेच पण यामागे असंख्य हात आणि डोकीसुध्द अहोरात्र झटत आहेत.  गेल्या वर्षभरात विकसित भारत ऍंबेसिडर, मेरा सांसद, विकसित भारत संकल्प यात्रा, व्होकल फॉर लोकल, स्वयंसेवक बना, विकास यात्रा, गाव चलो अभियान, घर चलो अभियान, शक्तिवंदन अभियान , बस्ती संपर्क अभियान, दिवार लेखन अभियान या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या योजना घराघरात पोहोचविण्याचे काम पंतप्रधान ते बुथस्तरीय कार्यकर्ते यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे आज सर्व जण मोदी गॅरंटी देत आहेत.

अबकी बार ४०० पार चा नारा देत असतानाच वरील सर्व अभियानांसोबत भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार चाहर यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र भाजपा किसान मोर्चा दि. १४ फेब्रुवारी ते १५ मार्च या कालावधीत ग्राम परिक्रमा यात्रा अभियान सुरू करत आहे. या यात्रेच्या नियोजनाची सभा काल वसंत भवन ओरोस येथे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. त्यात या यात्रेच्या शुभारंभाचा मान वेंगुर्ला तालुक्याला देण्यात आला. त्याचं नियोजन वेंगुर्ला मंडलाने केलेलं असून यात्रेचा शुभारंभ वेंगुर्ला तालुक्यातील अणसूर या गावात मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वा. होणार आहे.

यावेळी किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत , आमदार नितेश राणे, सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली, किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस राजन चिके, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष भाई बांदकर , जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यात्रेचा शुभारंभ गोमाता पूजन करुन होईल. त्यानंतर तालुक्यातील शेतकरी, बागायतदार, कृषी व्यापारी आणि शेतमजूर यांची बैठक होईल. या बैठकीत मागील दहा वर्षात मोदी सरकारने शेतकरी हिताच्या राबविलेल्या आश्वासक योजनांची माहिती दिली जाईल.

     त्यानंतर आंबा बागायतीवर आलेलं अस्मानी संकट थ्रीप्स वर शेतकऱ्यांना तज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच नारळ बागायतदार आणि युवक व शेतमजूरांना नारळ काढणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यशस्वी प्रशिक्षणार्थींना मोफत शिडी आणि नारळ रोपे देण्यात येतील.

     तरी या मार्गदर्शन शिबिर व प्रशिक्षणाचा वेंगुर्ला तालुक्यातील शेतकरी, बागायतदार आणि शेती पुरक व्यवसाय करणाऱ्यांनी व शेतमजूरांनी लाभ घ्यावा. 

     शेती संबंधीत काही सूचना व अपेक्षा असल्यास त्या शेतकऱ्यानी लेखी स्वरूपात मांडाव्यात की जेणेकरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तयार करत असलेल्या संकल्प पत्रा करीता त्याची नोंद करता येईल.

       शुभारंभ केल्यानंतर प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर चालूच राहील. पदाधिकारी व कार्यकर्ते यात्रेचाच पूढचा भाग म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात प्रगतशील शेतकरी, कृषी व्यापारी, स्थानिक शेतकरी आणि शेतमजूर यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतील. त्यांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती देतील व व्यथा जाणून घेतील. दुपारी जेवणानंतर प्रदेश व जिल्हा पदाधिकारी कुडाळ येथील ग्राम परिक्रमा यात्रे करीता रवाना होतील. मात्र स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते ही यात्रा पूढे चालू ठेवतील. अशी माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई आणि भाजपा किसान मोर्चा चिटणीस तथा ग्राम परिक्रमा यात्रा संयोजक विजय रेडकर यांनी दिली.

   यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, किसान मोर्चा अँग्रोवन चे बाळु प्रभु, किसान मोर्चा जि.उपाध्यक्ष किर्तीमंगल भगत , जि.का.का.सदस्य आनंद उर्फ बिटु गावडे, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, पेंडुर सरपंच संतोष गावडे, शक्तिकेंद्र प्रमुख विजय बागकर, अनुसूचित जाती मोर्चाचे गुरुप्रसाद चव्हाण, जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस, बुथ प्रमुख रविंद्र शिरसाट इत्यादी उपस्थित होते .