भाजपच शिवसेनेला चॅलेंज | कणकवलीत संजय राऊत यांच्याविरोधात कार्यकर्ते आक्रमक

पोलिसांना दिलं निवेदन
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 18, 2023 15:29 PM
views 199  views

कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करत खासदार संजय राऊत यांचा भारतीय जनता पार्टीतर्फे जाहीर निषेध करण्यात आला. मंत्री राणे यांच्यावर अयोग्य वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. राऊत यांचा बंदोबस्त करण्यात यावा व तात्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी आंदोलन छेडेल, अशी आक्रमक भूमिका मांडत कणकवली तालुका भाजपच्या वतीने भाजप जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे, तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, संजना सावंत, मेघा गांगण, आण्णा कोदे, प्रज्ञा ढवण, शिशिर परुळेकर, आशिये सरपंच महेश गुरव, विजय चिंदरकर, श्री. दळवी, यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांना निवेदन देण्यात आले.