
वेंगुर्ला : मठ गावातील सहकाऱ्यांच्या माध्यमातून विकासकामासाठी पाठपुरावा सुरु होता. खा. नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मठ गावातील एकूण 8 विकासकामासाठी 1 कोटी 75 लाख रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. मठ गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध राहील, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी आज शनिवारी (3 जानेवारी) मठ येथे बोलताना व्यक्त केले. दरम्यान गावातील उर्वरित विकासकामेही मार्गी लावू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
मठ गावातील एकूण 8 विकासकामाचे भूमिपूजन आज जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यामध्ये मठ कणकेवाडी शाळा नं. 3 नवीन इमारत बांधणे, दक्षिण कणकेवाडी रस्ता खडिकरण - डांबरीकरण करणे,
मठ वडखोल रस्ता डांबरीकरण करणे, कणकेवाडी स्टॉप रस्ता डांबरीकरण करणे, टाकयेवाडी रस्ता खडिकरण - डांबरीकरण करणे, शिवाजी चौक ते ठाकूरवाडी अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे, धुरीवाडी ते कावलेवाडी रस्ता खडिकरण - डांबरीकरण करणे, मठ शाळा नं. 1 नजीक अंगणवाडी इमारत बांधणे इत्यादी कामांची भूमिपूजने संपन्न झाली. यावेळी सर्वप्रथम मठ कणकेवाडी शाळा नं. 3 शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुदेश राणे यांच्या हस्ते मनिष दळवी यांचा सन्मान करण्यात आला.
या सर्व कार्यक्रमांस भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, मठ सरपंचा रुपाली नाईक, उपसरपंच सोनिया मठकर, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष सायमन आल्मेडा, वेंगुर्ला श्री देवी सातेरी देवस्थानचे दाजी परब,मारुती दोडशानट्टी, ग्रा. पं. सदस्य संतोष वायंगणकर, सिद्धी गावडे, शमिका मठकर, माजी सदस्य समिर मठकर, मठ सोसायटी चेअरमन सुभाष बोवलेकर, मुख्याध्यापक विरधवल परब, अजित नाईक, प्रशांत नाईक, रवी खानोलकर, अवि खानोलकर, प्रसाद सावंत, बबन परब, स्वप्नील धुरी, शैलेश राणे, पप्पू सावंत, वामन गावडे, देवस्थान कमिटीचे मनोहर गावडे, शंकर गावडे, योगेश गावडे, शंभु परब, प्रकाश गावडे, प्रकाश परब, संदेश निवजेकर, संकेत निवजेकर, दादा गावडे, अरुण गावडे, सुभाष परब, आनंद सावंत, शंकर सावंत, गौरव गावडे, बाळू भगत, सचिन आईर, भाई दाभोलकर, सीमा परब, उत्तम सकपाळ, अशोक सकपाळ, मंगेश नाबर, वासुदेव ठाकूर, अनिल तेंडोलकर, बाळकृष्ण मेस्त्री, शक्तीकेंद्र प्रमुख विजय बोवलेकर, देवेंद्र गावडे, गौरव गावडे, बाळू धुरी, संतोष परब, महेश धुरी, उमेश धुरी, अजित परब, मठ शाळा नं. 1 शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष तेंडोलकर, अंगणवाडी सेविका अर्चना मेस्त्री, अशोक मेस्त्री, एकेश्वर नाईक, समिर मठकर, संतोष परब, यशवंत नाईक आदीसह मठ गावातील ग्रामस्थ, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










