भाजपात रस्त्यावरुन उतरुनही संघर्ष कऱण्याची ताकद

रत्नागिरी जिल्हाध्यक्षांचा इशारा
Edited by: मनोज पवार
Published on: July 24, 2025 17:10 PM
views 69  views

मंडणगड : विकासात्मक व संघटनात्मक अशा दोन्ही पातळ्यांवर पार्टीचे काम वाढविण्यासाठी अग्रक्रम देत स्थानीक स्वराज्य संस्थाच्या येऊ घातलेल्या निवडणुकांना भारतीय जनता पार्टी सोमोरे जाणार असल्याचे प्रतिपादन पार्टीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतिश मोरे यांनी मंडणगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या वाढदिवसाचे निमीत्ताने 22 जुलै 2025 रोजी धुत्रोली येथील शिवस्मारक भवन येथे आयोजीत मेळाव्यास त्यांची उपस्थिती लाभली या निमीत्ताने पत्रकार परिषद आयोजीत करण्यात आली होती. 

पत्रकार परिषदेस माजी आमदार सुर्यकांत दळवी, माजी आमदार विनय नातू, माजी जिल्हा अध्यक्ष केदार साठे, माजी तालुका अध्यक्ष अप्पा मोरे, तालुका अध्यक्ष प्रविण कदम, यांची उपस्थिती लाभली.  यावेळी पत्रकरांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना श्री. मोरे म्हणाले की केंद्र व राज्यशासनाच्या एकाच पक्षाचे सत्तेचा कोकणचे विकासास उपयोग करुन घेण्याचा प्रयत्न आहे. त्यात कोकणचे नेते रविंद्र चव्हाण पार्टीचे प्रदेश स्तराचे अध्यक्ष असल्याने विकासाची रखडलेली कामे व प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुर आहेत. महायुतीत योग्य समन्वय साधुन आगामी काळात स्थानीक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांना महायुतीचे माध्यमातून सामोरे जायचे आहे. पक्ष नेतृत्व घेईल त्या निर्णयानुसार निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. त्यासाठी संघटना मजबुत करण्याबरोबरच विकास कामांचा समतोल राखण्याचा पार्टीचा प्रयत्न आहे. तालुकास्तरापासून पार्टीची धुरा युवा नेतृत्वाकडे भविष्यातील पक्षाची वाटचाल लक्षात घेऊनच देण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टी ही सर्वसमान्यांचे विकासाचे राजकारण करते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी व सार्वजनीक समस्या सोडवण्यासाठी आवश्यकता भासल्यास पार्टी रस्त्यावरुन उतरुनही संघर्ष कऱण्याची ताकद ठेवते असे माजी आमदार सुर्यकांत दळवी यांनी सांगीतले. मंडणगड तालुक्याचे विकासाचे प्रश्नावर माजी आमदार या नात्याने बारीक लक्ष असून संधी मिळेल त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे यावेळी सांगीतले.