सावंतवाडीत भाजपच भव्य कार्यालय ; पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

नव्या कार्यालयासाठी भाजप नेते महेश सारंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली विशेष मेहनत
Edited by: विनायक गांवस
Published on: November 30, 2022 15:54 PM
views 216  views

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीच्या सावंतवाडी तालुका मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, बाळू देसाई आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सावंतवाडी तालुक्यातील भाजपच हे भव्य दिव्य कार्यालय असून आमच्या हक्काच कार्यालय सावंतवाडीत सुरु झालं याचा आनंद शब्दांत व्यक्त करू शकत नाही अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. अगदी अल्पावधीत हे कार्यालय उभारण्यात आलं असून यासाठी भाजप नेते महेश सारंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.


सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सावंतवाडी तालुका भाजप कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. रामेश्वर प्लाझा येथे संपन्न झाला. यावेळी सातार्डा युवा सेना उपविभाग प्रमुख पिंटू परब यांनी संजू परब यांच्या माध्यमातून पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.


या कार्यक्रमावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब, बाळू देसाई, राजन म्हापसेकर, प्रमोद कामत, भाजपचे बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, आंबोली मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष 

अजय गोंदावळे, महिला शहराध्यक्ष मोहीनी मडगावकर, जिल्हा बँक संचालक गजानन गावडे, खरेदी विक्री संघ अध्यक्ष प्रमोद गावडे, प्रमोद सावंत, माजी जि.प. अध्यक्षा रेश्मा सावंत, माजी जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, तालुका उपाध्यक्ष शेखर गांवकर, माजी जि.प. सभापती शर्वाणी गावकर, माजी जि.प. सदस्या श्वेता कोरगांवकर, माजी सभापती पंकज पेडणेकर, माजी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, ॲड. परिमल नाईक, उदय नाईक, राजू बेग, आनंद नेवगी, दिपाली भालेकर, माजी उपसभापती शितल राऊळ, गुरुनाथ सावंत, जावेद खतीब, ज्ञानेश्वर सावंत,  नेमळे सरपंच विनोद राऊळ, सुकन्या टोपले, वामन नार्वेकर, मळगांव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, मळगांवचे माजी सरपंच गणेश पेडणेकर, कोलगाव सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग, निशांत तोरस्कर, माजी पं.स. सदस्य बाबू सावंत, दिलीप भालेकर, संजू शिरोडकर, दादा परब, संतोष गांवस, हेमंत मराठे, विनोद सावंत, मेघना साळगांवकर, लवू भिंगारे, परिक्षात मांजरेकर, पंढरीनाथ राऊळ, आंबोली उपसरपंच दत्तु नार्वेकर, खरेदी विक्री संचालक आत्माराम गावडे, विराग मडकईकर आदींसह भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य, तालुका कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य, शहर मंडल कार्यकारीणी पदाधिकारी व सदस्य, सर्व सेलचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बुथ अध्यक्ष तसेच अन्य लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.