ओटव ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा..!

शिवसेना ठाकरे गटाचा दारुण पराभव | सरपंच पदासहित तीनही सदस्य पदांवर भाजपचा विजय
Edited by:
Published on: November 06, 2023 11:54 AM
views 411  views

कणकवली : ओटव सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या रूहिता तांबे यांना २६४ मते मिळवत १७९ एवढ्या मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाच्या कविता तांबे यांना ८५ मते मिळाल्याने पराभव झाला .सरपंच पदासहित तीनही सदस्य पदांवर भाजपचा विजय झाला तसेच अन्य ४ सदस्य बिनविरोध झाले आहेत. ओटव प्रभाग एक मध्ये एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या दीक्षा जाधव यांना १०३ मते मिळवत विजय संपादन केला. तर विरोधी उमेदवार कविता तांबे यांना १९ मते मिळाल्याने पराभव झाला. नोटा ३ मते पडली आहेत. प्रभाग क्रमांक ३ मधील दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या वैष्णवी गावकर यांना ८५ मते मिळवत विजय संपादन केला तर अनुष्का तांबे यांना ३२ मते(पराभव) मिळाली. नोटा ३ मते मिळाली.

दुसऱ्या जागेसाठी भाजपच्या लता तेली यांना ७९ मते मिळवत विजय संपादन केला तर गार्गी गावकर यांना ३९ मते(पराभव) मिळाली, नोटा २ मते पडली आहेत. विकास कामांच्या माध्यमातून जनतेचा प्रेम आणि विश्वास – हेमंत परुळेकर ओटव ग्रामपंचायत निवडणुकीत गेली ३० वर्ष केलेल्या विकास कामांच्या माध्यमातून जनतेचा प्रेम आणि विश्वास आमच्यावर होता. या निवडणुकीत आमदार नितेश राणे,भाजपा उपाध्यक्ष गोट्या सावंत,तालुका अध्यक्ष संतोष कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार यंत्रणा आम्ही राबवली. ओटव गावातील नागरिकांनी पुन्हा एकदा विकासाला मतदान केलं, जनतेने टाकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी पुढील पाच वर्षात काम केले जाईल, विरोधकांनी तालुका पाथरी वरून आमच्या विरोधात उमेदवार देऊन लढण्याचा प्रयत्न केला. मात्र जनतेने त्यांचा दारुण पराभव केला. निवडणूक संपली आता राजकारण संपेल. पुढील काळात गावच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम केले जाईल अशी प्रतिक्रिया पॅनल प्रमुख तथा माजी सरपंच हेमंत परुळेकर यांनी दिली. नूतन सरपंच रुहिता तांबे म्हणाल्या, गावच्या विकासासाठी पुढील पाच वर्षात प्रामाणिकपणे काम केले जाणार आहे. माजी सरपंच हेमंत परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचे काम केले जाईल.