विठ्ल पंचायतन देवस्थानच्या प.पु.दादा पंडीतांचा भाजपच्या वतीने सत्कार

गाव वस्ती संपर्क अभियान अंतर्गत कार्यक्रमाचं आयोजन
Edited by:
Published on: April 27, 2025 19:47 PM
views 21  views

वेंगुर्ला : भाजपाच्या गाव वस्ती संपर्क अभियान अंतर्गत वेंगुर्ले तालुक्यातील खानोली सुरंगपाणी येथील श्री. विठ्ठल पंचायतनाला भेट देवुन प.पु.दादा पंडित यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील महायुतीचे सरकार हे हिंदुत्ववादी सरकार असल्याचे सांगुन पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे श्रीराम मंदिर झाल्याचे प.पु.दादा पंडित महाराज यांनी सांगितले .

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक , खानोली सो.सा.चेअरमन प्रशांत खानोलकर , उपसरपंच रविंद्र धोंड , मा.जि.प.सदस्य बाबा राऊत , बुथप्रमुख 270 / 41 महेश मुणनकर , बुथप्रमुख 270 / 20 आबा धोंड , ग्रामपंचायत सदस्या विद्या गोवेकर , ग्रामपंचायत सदस्या राखी धोंड , मा.सरपंच रसिका पंडीत , काशीराम धोंड , श्रीधर पंडित , मनिष कुबल , राघोबा हंजनकर , हनुमंत नाईक , मिलिंद पंडित इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.