देवगडमध्ये अनेकांचा भाजप प्रवेश..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 16, 2024 12:01 PM
views 180  views

देवगड :  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने तालुका पदाधिकारी कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन जिल्हाध्यक्ष नवलराज काळे व जिल्हा पदाधिकारी यांनी प्रदेश उपाध्यक्ष बाळा गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत केले असून या बैठकीची सुरुवात देवगड तालुक्यातून करण्यात आली. या बैठकीचे नियोजन भटके विमुक्त आघाडीचे देवगड तालुका अध्यक्ष तथा लोकसभा संयोजक संतोष साळसकर यांनी केले. या नियोजनात तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, विधानसभा प्रभारी तथा पडेल मंडल अध्यक्ष बाळू कोकरे यांनी सहकार्य केले. भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या पहिल्याच बैठकीत समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचा पक्षप्रवेश घेण्यात आला. या पक्षप्रवेशामध्ये शिवसेना उबाठा गटाचे आरे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सुनील खरात त्याचप्रमाणे देवगड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या पुनम कोकरे (पोंभूर्ले), स्मिता काळे (मणचे), प्रतीक्षा गोरे (पोंभूर्ले) सुवर्णा काळे(मणचे), भानुबाई तांबे(मणचे) सुनंदा काळे(मणचे), संतोष कोकरे (गोवळ), संपदा कोकरे (गोवळ) या भटके विमुक्त जातीमधील बंधू-भगिनींचा समावेश आहे.

कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे व सिंधुदुर्ग जिल्हा भाजप भटके विमुक्त आघाडी यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवत माजी आमदार ऍड.अजित गोगटे , भाजप भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष बाळा गोसावी, जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, देवगड तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर, भाजप भटके विमुक्त आघाडी देवगड मंडलाध्यक्ष तथा लोकसभा संयोजक संतोष साळसकर, विधानसभा प्रभारी तथा पडेल मंडल अध्यक्ष बाळू कोकरे, जिल्हा खजिनदार महेश जंगले यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वांनी भाजप पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी सर्वांचे पक्षांमध्ये स्वागत केले. यावेळी माजी आमदार ऍड.अजित गोगटे , भाजप भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष बाळा गोसावी, जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, देवगड तालुका मंडळाध्यक्ष संतोष किंजवडेकर, भाजप भटके विमुक्त आघाडी देवगड मंडलाध्यक्ष संतोष साळसकर, पडेल मंडल अध्यक्ष बाळू कोकरे, जिल्हा खजिनदार महेश जंगले, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, नगरसेविका तनवी चांदोसकर, नगरसेविका कावले, विलास मंचेकर, देवगड तालुका सरचिटणीस शरद ठुकरुल, दया पाटील भाजपा पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.