
सावंतवाडी : लोकसभा निवडणूकीत भाजप संविधान बदलण्याच्या प्रयत्न आहेत असा खोटा आरोप करणाऱ्या कॉग्रेस नेते राहूल गांधी यांनी विदेशात झालेल्या एका कार्यक्रमात आपली सत्ता आल्यास संविधान बदलण्यात येणार आहे असे विधान केले. याचा अर्थ त्यांची भूमिका दुटप्पी आहे आणि त्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो असं मत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे तोपर्यंत कोणीही संविधान या विषयाला हात लावू शकत नाही. राहुल गांधी यांच्या विधानाचा सिंधुदुर्ग भाजप तर्फे त्यांनी जाहीर निषेध केला. तर अमेरिकेत बसलेले काँग्रेसचे राहुल गांधी हे जे-जे बोललेत त्यांचा पूर्ण इंटरव्ह्यू जनतेने पाहिलेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी हे सत्तेत आल्यावर संविधान संपवून टाकणार आहेत. हे सत्य कोणीही पुसू शकत नाही असेही सावंत म्हणाले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, जिल्हा चिटणीस महेश सारंग, आंबोली मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, सुहास गवंढळकर, प्रमोद गावडे, परीक्षित मांजरेकर, विनोद सावंत आदी उपस्थित होते