भाजपचे नगरसेवक आक्रमक ; प्रशासनाला जाग !

कचरा उचलण्यास सुरुवात
Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 16, 2024 09:37 AM
views 438  views

देवगड : देवगड जामसंडे नगरपंचायतीने डम्पिंग ग्राउंड नसल्यामुळे देवगड जामसंडे शहरातून गोळा केलेला कचरा हा नगरपंचायत परिसरातील डम्पिंग केला जात होता. त्यामुळे नगरपंचायत परिसरात दुर्गंधी पसरली होती. लोकसभा निवडणुकीचे गरमागरम वारे असल्यामुळे विरोधकांनीही याकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र निवडणुका संपल्यानंतर भाजपाने या कचरा प्रश्न आक्रमक होत नगरपंचायत कार्यालयांवरच धडक देत नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांना याबाबतचा जाब विचारला. पण अपेक्षित उत्तर न मिळाल्याने मुख्याधिकारी यांना देखील याबाबतचा जाब विचारला. दोन दिवसात मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी कचरा उचलला जाईल असे आश्वासन दिले होते.

त्यानुसार नगरपंचायतीच्यावतीने हा कचरा उचलण्यास बुधवार पासून सुरुवात झाली. जेसीबीच्या सहाय्याने हा कचरा उचलून डंपर मधून नेऊन तो इतरत्र ठिकाणी हलविण्यात येत आहे. उशिरा का होईना मात्र भाजपाने आंदोलन केल्यानंतर नगरपंचायत प्रशासनालाही जाग आल्याने येथील कचरा हलविण्यात आला. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत न दिसत आहे.परंतु स्वच्छतेची महती पटवून देणाऱ्या नगरपंचायत प्रशासनाच्या चुकीमुळे नगरपंचायत होऊन सात वर्षे झाली तरी नेहमी सत्ताधारी आणि विरोधक यामध्ये खंडोबा घनकचरा व्यवस्थापन या विषयावरून शाब्दिक चकमक होताना कायम पहायला मिळतेय .