महाविकास आघाडीचा भाजपने केला निषेध !

Edited by: विनायक गावस
Published on: October 21, 2023 14:12 PM
views 224  views

सावंतवाडी : कंत्राटी कर्मचारी भरतीचा निर्णय घेणाऱ्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा निषेध भारतीय जनता पार्टीच्या आंबोली व सावंतवाडी मंडळाकडून करण्यात आला. माजी आमदार राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयासमोर करण्यात आलं. यावेळी खोटं बोला पण रेटून बोला ही महाविकास आघाडीची निती आहे. त्यांच्या सरकारच्या काळात कंत्राटी भरती प्रक्रियेच केलेलं पाप धुवून काढायचं काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल आहे. कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याच विधान माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथील निषेध आंदोलना दरम्यान ते बोलत होते. 

यावेळी महाविकास आघाडी सरकारसह शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या विरोधात भाजप पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कंत्राटी कर्मचारी भरतीचा निर्णय घेणाऱ्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा निषेध त्यांनी यावेळी केला.

याप्रसंगी राजन तेली म्हणाले, कंत्राटी भरती ही तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून उद्धव ठाकरेंपर्यंत होती. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी ही भरती सुरू केली होती. मात्र ही उलट चर्चा करत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार या महायुती सरकारवर कंत्राटी भरतीच पाप लादण्याच काम महाविकास आघाडी करत आहे. त्यामुळे आज भाजपनं याचा निषेध केलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही कंत्राटी भरती प्रक्रिया रद्द केली असून  शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे व नाना पटोले या महायुतीला दोष देणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा पर्दाफाश देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. खोट बोला पण रेटून बोला हे विरोधकांच काम आहे. त्यांच पाप धुण्याच काम आमच्या नेत्यांनी केल आहे. त्यामुळे आमच्या नेत्यांचा आम्हाला अभिमान आहे. तर आमच्या कोकणातील स्थानिक भूमिपुत्रांना न्याय द्या अशी मागणी देखील आम्ही केली आहे अस मत तेली यांनी व्यक्त केल.

यावेळी माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, रविंद्र मडगावकर, राजू बेग, मनोज नाईक, चंद्रकांत जाधव, प्रमोद गावडे, दिलीप भालेकर, मोहिनी मडगावकर, बंटी पुरोहित, संजू शिरोडकर, हनुमंत पेडणेकर, प्रथमेश तेली, अजय सावंत, अमित परब, परिक्षीत मांजरेकर, केतन आजगावकर, विनोद सावंत, ज्ञानेश पाटकर,मेघना साळगावकर,आदी उपस्थित होते.