वेंगुर्लेत संजय राऊत विरोधात भाजपची पोलिसांकडे तक्रार

विनायक राऊत यांनी नारायण राणेंबद्दल अपशब्द वापरून मानहानि केल्याबद्दल तक्रार दाखल
Edited by:
Published on: January 19, 2023 14:51 PM
views 141  views

वेंगुर्ला: केंद्रीय कॅबिनेट मंत्री व भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते नारायण राणे यांच्या बद्दल खासदार संजय राऊत यांनी लज्जास्पद शब्द वापरून अवमान केल्याबद्दल त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा तसेच या घटनेचा भारतीय जनता पार्टी , वेंगुर्ले तर्फे जाहीर निषेध करण्यात आला. सदर प्रकरणांची गंभीर दखल घेऊन संजय राऊत यांच्यावर त्वरीत गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी असे न झाल्यास भारतीय जनता पार्टी , वेंगुर्ले तालुक्याच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिला त्यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर , महीला ता.अध्यक्षा स्मिता दामले , जिल्हा उपाध्यक्ष ॲड सुषमा खानोलकर व सोमनाथ टोमके , ता.सरचिटनीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर , उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर , नगरसेविका श्रेया मयेकर , माजी उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर , नगरसेवक नागेश ऊर्फ पिंटू गावडे , नगरसेवक धर्मराज कांबळी , नगरसेविका श्रेया मयेकर , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक , जि.प.सदस्य प्रीतेश राऊळ , ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे , शक्ती केंद्र प्रमुख विजय बागकर व गणेश गावडे व शामसुंदर मुननकर , माजी सरपंच मनोज उगवेकर , युवा मोर्चाचे तुषार साळगांवकर व भुषण सारंग व प्रीतम सावंत , किसान मोर्चा चे बाळु प्रभु , बुथ अध्यक्ष रविंद्र शिरसाट - पुंडलिक हळदणकर , विजय नाईक  , महीला मोर्चा च्या वृंदा गवंडळकर व वृंदा मोर्डेकर , रफिक शेख इत्यादी उपस्थित होते .