
कुडाळ : मठ - कुडाळ - पणदूर - घोडगे रस्त्याच्या उदघाटन कार्यक्रमापासून आमदार वैभव नाईक यांना रोखणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात ठाकरे सेनेच्या वतीने डिगस पतपेढी येथे लावण्यात आलेला निषेधाचा बॅनर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हटविण्यात आला.
दुसरीकडेच डिगस गावातील कॅटल हाऊस गेल्या 27 वर्षाचे अतिक्रमण हटवून गावाची मालमत्ता डिगस ग्रामपंचायत ने ताब्यात घेतल्याबद्दल ग्रामपंचायत डिगस चे सरपंच व पदाधिकारी यांचे जाहीर आभार मानण्यात आले आहेत तर त्याच बॅनरवर गावाची मालमत्ता अनधिकृतपणे विना मोबदला 27 वर्ष मनमानी करून स्वतःच्या फायद्यासाठी व स्वार्थासाठी वापरल्याबद्दल त्या संस्थेचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांचा डिगस ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेध अशा आशयाचा बॅनर भारतीय जनता पार्टी डिगसच्यावतीने लावण्यात आला आहे.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आज मठ कुडाळ पणदूर घोडगे रस्त्याच्या कामाचा शासकीय शुभारंभ थोड्याच वेळात होणार आहे. त्यात भारतीय जनता पार्टी डिगसच्या वतीने लावण्यात आलेल्या बॅनरची चर्चा डिगस दशक्रोशीत होत आहे.