भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्यावतीने दिव्यांग लोकप्रतिनिधींचा सन्मान

Edited by: दिपेश परब
Published on: December 02, 2023 16:51 PM
views 167  views

वेंगुर्ला : जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्यावतीने वेंगुर्ले भाजपा कार्यालयात दिव्यांग लोकप्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. यावेळी वेंगुर्ले तालुक्यातील खानोली ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेले दिव्यांग बांधव सुनिल घाग यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 यावेळी मार्गदर्शन करताना दिव्यांग आघाडीचे अनिल शिंगाडे म्हणाले की, दिंव्यांगासाठी सुगम भारत निर्माण करण्यासाठी मोदी सरकार काम करत आहे . पॅराऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा ध्वज फडकवण्यासाठी मोदी सरकार विविध सोयीसुविधा देऊन दिव्यांगांना सक्षम बनवत आहे. त्यासाठी खेळाडुंना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे .

  केंद्रात सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दिव्यांगांसाठी अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या. मोदी सत्तेत येण्यापूर्वी गरिबी हटविण्याच्या अनेक घोषणा झाल्या, मात्र गरीबी हटली नाही . मोदी सरकार सत्तेत आल्यावर काही महिन्यातच गरीबांची बॅक खाती उघडण्याचा धडक कार्यक्रम सुरु झाला. या खात्यामध्ये केंद्र सरकारच्या विविध योजनांचे अर्थसाहाय्य डीबीटी द्वारे पाठवले जाऊ लागले. एक पैशाचाही भ्रष्टाचार न होता गरीब कल्याणाच्या योजनांची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी सुरु झाली. सरकार बदलले म्हणजे नेमके काय झाले, याचा अनुभव देशातील जनता गेली नऊ वर्षे घेत आहेत .

    देशातील किमान ५० % शासकीय इमारती विकलांगांसाठी सुविधायुक्त बनविण्याचा संकल्प या योजनेतून मोदी सरकारने सोडला. या योजनेतूनच दृष्टीहिनांसाठी सुगम्य पुस्तकालय ही ऑनलाईन ग्रंथालय योजनाही सुरु करण्यात आली. शिवाय , विकलांगाकरीता मोफत स्वयंचलित तिनचाकी देण्याची योजनाही यामध्ये समाविष्ट आहे .

     सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाच्या वतीने विकलांगांच्या सर्वांगीण सबलीकरणाची ही योजना अंमलात आली आहे. विकलांगांना रोजगार , सामाजिक  न्यायाच्या समान संधी देणाऱ्या या महत्वकांशी योजनेची अंमलबजावणी स्वयंसहाय्यता गटांच्या सहकार्याने करण्यात येते . या सर्व योजनांचा फायदा दिव्यांगांनी घेऊन आपले जीवन सुकर करावे असे आवाहन अनिल शिंगाडे यांनी केले. 

   कार्यक्रमाच्या सुरुवातीला तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी दिव्यांग विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले .तसेच प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांनी केले. यावेळी दिव्यांग विकास आघाडीच्या दिक्षा तेली (देवगड),  प्रकाश सावंत ( कणकवली ),  दिपक करंगुटकर ( पालकरवाडी ) , समिधा घाग ( खानोली ) , शैलेश गावडे ( आसोली ) , किर्ती रमेश वालावलकर  ( खानोली ) , चंद्रशेखर खानोलकर ( वेंगुर्ले ) इत्यादी उपस्थित होते.

  या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुषमा खानोलकर , तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर , जिल्हा कार्यकारणी सदस्य मनवेल फर्नांडिस , बाळा सावंत , वसंत तांडेल , सरपंच संघटनेचे पप्पु परब , पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील , आरवली सरपंच समीर कांबळी , आसोली ग्रा. पं. सदस्य स्वप्नील गावडे , शक्तिकेंद्र प्रमुख कमलेश गावडे व महादेव नाईक , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर व प्रीतम सावंत , महीला मोर्चाच्या आकांक्षा परब व रसिका मठकर, किसान मोर्चाचे बाळु प्रभु , अनुसूचित जाती मोर्चाचे किरण चव्हाण इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .