वैभववाडीत 11 नोव्हेंबरला महिला मेळावा

नीलमताई राणे मार्गदर्शन करणार
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 09, 2024 20:28 PM
views 248  views

वैभववाडी :  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ वैभववाडी येथे 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. वैभववाडी भाजपा कार्यालय समोरील पटांगणावर हा मेळावा संपन्न होणार आहे. सिंधुदुर्ग जिजाऊ महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ नीलमताई राणे यांच्या अध्यक्षतेखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

       याप्रसंगी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, भाजपा प्रभारी, महिला मोर्चा संयोजिका सुलक्षणा प्रमोद सावंत तसेच महिला पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. 

       तरी वैभववाडी तालुक्यातील महिला मोर्चा महिला पदाधिकारी, महिला आजी-माजी लोकप्रतिनिधी, महिला बुथ अध्यक्ष, महिला भगिनी व युवती यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वैभववाडी भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा प्राची तावडे यांनी केले आहे.