जांभवडेतील 'ते' कार्यकर्ते भाजपात परतले

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 09, 2024 19:16 PM
views 243  views

वैभववाडी : जांभवडे पालांडेवाडी येथील उबाठा सेनेत प्रवेश करणारे ते चार कार्यकर्ते पुन्हा भाजपात परतले आहेत. आज सकाळी भाजपा कार्यालयात त्यांचा पक्ष प्रवेश झाला. या चार कार्यकर्त्यांमध्ये नितेश दिनकर आयरे, प्रकाश कमलाकर पालांडे, संजय रघुनाथ पालांडे, संतोष शांताराम पालांडे यांचा समावेश आहे.

माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जांभवडेतील ग्रामस्थांनी उबाठा सेनेत प्रवेश केला होता. दुसऱ्याच दिवशी त्यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला चुकीची माहिती सांगून वैभववाडीला बोलवून प्रवेश घेतला असे यावेळी प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितले. आम्ही आमदार नितेश राणे यांचे कट्टर कार्यकर्ते आहोत. तसेच विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांचेच काम करणार असल्याची प्रतिक्रिया प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.

वैभववाडी भाजपा कार्यालयात त्यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला. यावेळी माजी अध्यक्ष नासीर काझी, भालचंद्र साठे, स्वप्निल खानविलकर, देवानंद पालांडे, हुसेन लांजेकर, प्रकाश पाटील, राजेंद्र राणे, नवनाथ पालांडे, दत्ताराम सावंत आदी उपस्थित होते.