भाजपचे दर्शन दळवी, लक्ष्मण दळवी पुन्हा स्वगृही

Edited by:
Published on: November 07, 2024 20:40 PM
views 329  views

मालवण : सुकळवाड येथे दोन दिवसांपूर्वी आमदार वैभव नाईक यांनी तळगाव येथील दर्शन दळवी व लक्ष्मण दळवी यांचा उबाठा गटात प्रवेश दाखवला होता मात्र आज दर्शन दळवी यांनी निलेश राणे यांची भेट घेत वैभव नाईक यांनी आपली फसवणूक करत प्रवेश घेतल्याचे सांगत भारतीय जनता पक्षात पुन्हा काम करण्याची संधी मागितली त्या नंतर पणदूर येथे झालेल्या कार्यक्रमात निलेश राणे यांच्या हस्ते दर्शन दळवी व लक्ष्मण दळवी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 


यावेळी बोलताना दर्शन दळवी यांनी आपण राणेंचेच कार्यकर्ते असून वैभव नाईक यांनी आपली फसवणूक केल्याची प्रतिक्रिया देत आपण तळगाव गावातून निलेश राणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देऊ असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी जगदीश चव्हाण, तळगाव उपसरपंच संतोष पेडणेकर, अरविंद तळगावकर आदी उपस्थित होते.