कणकवली भाजपा युवामोर्चा चिटणीसपदी महादेव नलावडे

Edited by: साहिल बागवे
Published on: October 22, 2024 10:49 AM
views 66  views

कणकवली : कणकवली भाजपा युवामोर्चा चिटणीसपदी महादेव उर्फ ऋतिक नलावडे यांची निवड करण्यात आली असून नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांच्या निवडीबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. भाजपा युवा मोर्चा जिल्हा कार्यकरणी नुकतीच जाहीर झाल्यानंतर ही निवड करण्यात आली. 

निवडीअंती नलावडे म्हणाले की, भाजपायुवा मोर्चाच्या माध्यमातून कणकवली तालुक्यात भाजप पक्ष वाढीसाठी  व वरिष्ठाना अभिप्रेत काम करणार असल्याचे सांगितले.