विशाल पोळ यांचा भाजपात प्रवेश

Edited by: देवयानी वरसकर
Published on: September 23, 2024 13:23 PM
views 336  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील बिडवाडी गावचे विशाल संजय पोळ यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर  पक्ष प्रवेश केला. बिडवाडी गावविकासासाठी आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून न्याय मिळू शकतो. ग्रामस्थांच्या प्रश्नांना न्याय देणे महत्वाचे आहे. आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन आणि विश्वास ठेवून गाव विकासासाठी भाजपात प्रवेश केला असल्याचे विशाल पोळ यांनी सांगितले.

ओम गणेशवर झालेल्या पक्षप्रवेशावेळी कणकवली विधानसभा निरीक्षक आशिष शिरोडकर,भाजप  जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत,तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,  संदीप सावंत, प्रशांत चव्हाण, आनंदराव साटम, दादा भोगले, अनंत मगर, पांडूरंग मगर, आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.