
सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीबद्दल अनुप मोरे यांची प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज नरिमन पॉईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयात भेट घेत शुभेच्छा दिल्या. यावेळी विशाल परब यांनी युवा मोर्चाच्या संघटनात्मक वाटचालीबाबत त्यांच्याशी चर्चा केली.
नरिमन पॉईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयात महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने ठाणे-कोकण विभागाची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत सर्व प्रदेश पदाधिकारी, सदस्य, जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस तसेच मंडल अध्यक्ष उपस्थित होते.युवा मोर्चाच्या पुढील संघटनात्मक वाटचालीबद्दल आणि आगामी कार्यक्रमांबद्दल यावेळी चर्चा करण्यात आली. आगामी निवडणूकीच्यादृष्टीने युवा मोर्चा अॅक्शन मोडमध्ये आला असून संघटनात्मक पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.यावेळी प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, निखिल चव्हाण, बादल कुलकर्णी, योगेश मेद, सुदर्शन पाटसकर, रुपेश सावरकर आदी प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते