
मालवण : भाजपा माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांची भाजपच्या मालवण ग्रामीण मंडल प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक जबाबदारी लुडबे यांच्यावर देण्यात आली आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी ही निवड जाहीर केली आहे.