
देवगड : देवगड येथील पडेल भाजप मंडल अध्यक्षपदी विठलादेवी येथील महेश उर्फ बंड्या नारकर यांची वर्णी लागली. याबाबतचे नियुक्तीपत्र भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी देऊन ही निवड जाहीर केले आहे.
यावेळी आमदार नितेश राणे, माजी आमदार अजित गोगटे, माजी जि.प अध्यक्ष संदेश सावंत, भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आदींसह भाजप जिल्हा कार्यकारणी, पदाधिकारी उपस्थित होते,