माझी लाडकी बहिण योजना वैभववाडीत प्रभावीपणे राबविणार : प्राची तावडे

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 29, 2024 16:07 PM
views 67  views

वैभववाडी:महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही अतिशय महत्वपुर्ण योजना राबविण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे.या योजनेच्या माध्यमातून तळागाळातील महिला सक्षम होतील.ही योजना सर्वसामान्य महीला पर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत भाजपाच्या महिला तालुकाध्यक्ष प्राची तावडे यांनी येथे व्यक्त केले.

येथील भाजपा कार्यालयात सौ.तावडे यांची पत्रकार परिषद झाली.यावेळी नगराध्यक्ष नेहा माईणकर,स्नेहलता चोरगे,सीमा नानीवडेकर,यामिनी वळवी,संगीता चव्हाण,सुंदराबाई निकम,आदी उपस्थित होत्या.

सौ.तावडे म्हणाल्या महायुती सरकारने अतिशय गरज असलेली आणि महत्वपुर्ण अशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.ही योजना तळागाळातील हजारो दीनदुबळ्या महिलांना आधार बनणार आहे.त्यामुळे आम्ही देखील ही योजना तळागाळातील महिलापर्यत पोहोचविण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना पत्रव्यवहार करणार आहोत.महिला सरपंचाशी फोनद्वारे संपर्क साधणार आहोत.याशिवाय महिला बचत गटाच्या माध्यमातुन आम्ही महिलांशी सपंर्क साधणार आहोतत.ज्या  महिला या योजनेच्या लाभार्थी होऊ शकतील अशा महिलांना उत्पन्नाचा दाखला किवा अन्य  कागदपत्रे वेळेत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.तसेच या योजनेचे अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवून मिळावी अशी मागणी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत.हा धाडसी निर्णय घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांचे सौ.तावडे यांनी आभार मानले.