BJPच्यावतीने वेंगुर्लेतील 10 वीच्या गुणवंतांचा सत्कार

Edited by: दिपेश परब
Published on: May 28, 2024 14:28 PM
views 152  views

वेंगुर्ला : दरवर्षीप्रमाणे भाजपा वेंगुर्लेच्यावतीने तालुक्यातील प्रथम दहा क्रमांकात येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन करण्यात आला. तालुक्यात प्रथम आलेली परुळे हायस्कुलचा अर्पिता सामंत व द्वितीय आलेल्या केळुस हायस्कुलच्या गायत्री बागलकर यांचा सत्कार परुळे विभागातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन केला. तसेच वेंगुर्ले तालुक्यात तृतीय आलेली वेंगुर्ले हायस्कूल ची विद्यार्थींनी प्रतिक्षा अशोक आरोलकर , तालुक्यात सहावी आलेली वेंगुर्ले हायस्कूल ची विद्यार्थीनी दुर्वा संदिप परब व तालुक्यात दहावी आलेली न्यु इंग्लिश स्कूल उभादांडा ची श्रृती श्रीधर शेवडे या तिनही विद्यार्थिनींचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन करण्यात आला .

  यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ९९.७१ % निकाल हा वेंगुर्ले तालुक्याचा लागला , तसेच तालुक्यातील १९ पैकी  १७ हायस्कूल चा निकाल १०० % लागला . तसेच ७०८ विद्यार्थांपैकी ७०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून गुणवत्तेत यावर्षीही मुलींनीच बाजी मारली.

   लवकरच भाजपा च्या वतीने तालुक्यातील दहावी व बारावीच्या प्रत्येक शाळेतील प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थांचा सत्कार , तसेच १०० % निकाल देणाऱ्या हायस्कूल च्या मुख्याध्यापकांचा सत्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येणार आहे .

    या सत्कार समारंभाच्या वेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, जिल्हा कार्यकारणी सदस्य वसंत तांडेल,  तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, मच्छिमार सेलचे दादा केळुसकर, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब, युवा मोर्चाचे मनोहर तांडेल व भुषण सारंग, मारुती दौडशानट्टी संभाजी सावंत, अशोक आरोलकर, संतोष सावंत, संदिप परब इत्यादी उपस्थित होते.