कणकवलीत ठाकरे गटाला धक्का ; गौरव हर्णे भाजपात !

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 23, 2024 14:17 PM
views 448  views

कणकवली : कणकवली  युवा सेना तालुका सरचिटणीस गौरव हर्णे यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

 मागील कणकवली नगरपंचायत निवडणुकीत गौरव हर्णे यांचा अवघ्या तीन मतांनी पराभव झाला होता. त्यानंतरही त्यांनी कणकवली शहरात शिवसेना युवा जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक यांच्यासोबत मित्रत्वाचे संबंध असल्याने संघटना वाढीचे काम चालू ठेवले होते. आज त्यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून आमदार नितेश राणे ह्यांच्या हस्ते त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शहरातील ठाकरे सेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.