जिल्ह्यातील भाजप युवा मोर्चा मंडळ अध्यक्षांची नियुक्ती !

Edited by: विनायक गांवस
Published on: March 04, 2024 11:45 AM
views 153  views

सावंतवाडी : भारतीय जनता युवा मोर्चा मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये कोलगाव सरपंच संतोष राऊळ यांची आंबोली मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर बांदा मंडळ अध्यक्षपदी सिद्धेश कांबळी, वेंगुर्ला मंडळ अध्यक्षपदी प्रणव वायंगणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष तथा कलमठ सरपंच संदिप चंद्रकांत मेस्त्री यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांच अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.याचप्रमाणे वैभववाडी किशोर दळवी, देवगड अनिल साटम व उत्तम बिर्जे, कणकवली सहदेव खाडये व सर्वेश दळवी, कुडाळ निखिल कांदळकर व रुपेश कानडे, मालवण मंडळ अध्यक्षपदी मंदार लुडबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटना बांधणीच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.