
कुडाळ : माणगाव येथील प. प.श्री.वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज जयंती सोहळा सोमवार ४सप्टेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमानी साजरा होणार आहे.
श्री टेंब्ये स्वामी महाराज जयंती निमित्त श्रींचे जन्मस्थानी सकाळी ७वा.पासून नामस्मरण दुपारी ३वा. पुराण वाचन,४-५ ०वा.श्रींचा जन्मसोहळा संपन्न होणार आहे. दत्तमंदिर येथे सकाळी ९वा.अभिषेक,त्यानंतर पटवर्धन आणि सहकारी (सांगली)प्रस्तुत स्वरभिषेक कार्यक्रम दू. १वा.प्रसन्न प्रभू तेंडुलकर (गोवा)यांचा स्वरदत्त हा गायनाचा कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद ,सायंकाळी आरती ७-३ ०वा.शरद बुवा घाग (नृसिंह वाडी)यांचे कीर्तन.मंगळवार ५सप्टे.रोजी सकाळी श्री दत्त मंदिर येथे अभिषेक पूजा दुपारी महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत तरी भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.