वाईल्ड कोकण सावंतवाडीच्यावतीने पक्षी निरीक्षण

Edited by: विनायक गांवस
Published on: November 14, 2025 16:21 PM
views 93  views

सावंतवाडी : वाईल्ड कोकण सावंतवाडी या संस्थेच्यावतीने 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीमध्ये आयोजित पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने सावंतवाडीतील सुप्रसिद्ध नरेंद्र डोंगर येथे पक्षी निरीक्षण करण्यात आले. या पक्षीनिरीक्षणामध्ये एकूण 46 पक्षी पाहण्यात आले. या पक्षीनिरीक्षणामध्ये वाईल्ड कोकण या संस्थेचे अध्यक्ष प्रा. धीरेंद्र होळीकर, उपाध्यक्ष प्रा. सुभाष गोवेकर, संस्थेचे सचिव प्रा.डॉ. गणेश मर्गज, संस्थेचे मार्गदर्शक व सावंतवाडीचे माजी डी.एफओ सुभाष पुराणिक ,बांदा येथील प्रसिद्ध पक्षीनिरीक्षक प्रवीण सातोसकर,जिल्हा परिषद माजी कर्मचारी जगदीश सावंत , कुणकेरी येथील संजय सावंत, कु ज्ञानेश नाईक, रुहान शेख ,रुपेश तेंडोलकर ,चैताली पाटकर, आर्या गायकवाड, ऐश्वर्या गायकवाड ,विना सावंत, कृपा परब, मनाली पार्सेकर, ओमकार परब यांनी या पक्षनिरीक्षणामध्ये सहभाग घेतला. 

महाराष्ट्रातील ज्येष्ठ पक्षी निरीक्षक मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस 5 नोव्हेंबर व सुप्रसिद्ध पक्षीतज्ञ पद्मश्री डॉ. सलीम अली यांचा जन्मदिवस 12 नोव्हेंबर या दोन्ही असामान्य पक्षी तज्ज्ञांच्या जन्मदिवसाच्या औचित्य साधून महाराष्ट्रामध्ये 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर हा आठवडा पक्षी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र पक्ष मित्र संघटनेच्यावतीने महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी पक्षी निरीक्षणाचे कार्यक्रम घेण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून वाइल्ड कोकण सावंतवाडी या संस्थेच्या वतीने सावंतवाडी नरेंद्र डोंगर येथे पक्षी निरीक्षण करण्यात आले. या पक्षी निरीक्षणाच्या वेळी फ्लेम थॉटेड बुलबुल, फॉर्क टेल ड्रोन्गो ककु, चेस्नट हेडेड बीइटर, हार्ट स्पॉटेड उडपीकर, लेसर व्हाईट थ्रोट, व्हाईट चिक्ड बार्बेट, ब्राऊन हेडेड बारबेट, ब्लू  राॅक थ्रश,व्हर्डीटर फ्लाय कॅचर ,गोल्डन फ्रंटेड लीफबर्ड, स्वर्गीय नर्तक, वेलवेट फ्रंटेड नट्याच, शिकरा ,व्हाइट रम्थप्ड शामा, ग्रीनीश बॅबलर, वेस्टर्न क्राउन्ड  वारब्लर आदी पक्षांची नोंद करण्यात आल. 

सकाळी सात ते नऊ या दोन तासांच्या कालावधीमध्ये केलेल्या पक्षी निरीक्षणांमध्ये तब्बल 46 पक्षांचे दर्शन झाले. यामध्ये काही प्रदेशानिष्ठ प्रजाती आढळून आल्या. या पक्षी निरीक्षणावरून नरेंद्र डोंगर येथील समृद्ध पक्षीविविधतेचे दर्शन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव डॉ. गणेश मर्गज यांनी केले तर आभार प्रा. सुभाष गोवेकर यांनी मानले