जिवंत काडतुस घेवुन दुचाकीवरून फिरणारे पोलिसांच्या ताब्यात...!

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 02, 2024 07:02 AM
views 213  views

वैभववाडी : हेत येथे विनापरवाना बदुंक आणि जिवंत काडतुस घेवुन दुचाकीवरून फिरणाऱ्या पन्हाळा येथील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.सागर दगडू नाईक आणि अभय रणजित पाटील या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई आज( ता.१)दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

वैभववाडी पोलीस ठाणेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल,पोलीस हवालदार एस.डी.कांबळे,कर्मचारी डी.सी.कानसे,कर्मचारी जितेंद्र कोलते हे आज दुपारी भुईबावडा ते नेर्ले मार्गावर गस्तीवर होते.दरम्यान त्यांना दोन युवक संशयास्पद रित्या फिरताना आढळले.पोलीसांना पाहताच ते  नेर्लेच्या दिशेने निघून गेले.पोलीसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.पोलीसांनी त्यांची तपासणी केली असता  ७५ हजार रूपयांची रायफल,तीन हजार रूपयांची जिवंत काडतुस,१० हजार रूपयांची मॅकझीन आदी सापडली.पोलीसांनी मुद्देमालासह  ४० हजार रूपये किमंतीची दुचाकी जप्त केली आहे.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.अवसरमोल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.