भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

Edited by: विनायक गांवस
Published on: November 01, 2025 13:17 PM
views 1382  views

सावंतवाडी : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना आज बारा वाजण्याच्या सुमारास मळगाव वेत्ये येथे चॉकलेट फॅक्टरीसमोर घडली. जखमी दुचाकी चालकाला रिक्षा मधून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


याबाबतची माहिती वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी दिली. दरम्यान मुंबई गोवा हायवेवर मोठ्या प्रमाणात अपघात होत असताना त्याठिकाणी ॲम्बुलन्सची सोय नसल्यामुळे अनेकवेळा अडचणी येतात. त्यामुळे ॲम्बुलन्स सोय करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. संबंधित दुचाकी चालक जखमी असुन त्याच्यावर उपचार सुरु आहेत.