कणकवलीत दुचाकी चोरीला...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: March 21, 2024 12:03 PM
views 667  views

कणकवली : शहरातील मराठा मंडळ रोड वरील क्रिस्टल रेसिडेन्सीमधून एक दुचाकी चोरीला गेली आहे. पहाटे ५.१० वाजता ही चोरी झाल्‍याची बाब सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. याबाबत दुचाकी मालक मंगेश तायशेटे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. क्रिस्टल रेसिडेन्सीमधील रहिवासी मंगेश सुरेश तायशेटे यांनी नेहमी प्रमाणे बिल्‍डींग खाली यामाहा आर एक्‍स १०० (एमएच ०७ डी ८१५८) ही दुचाकी दुरूस्त करून घेतली होती. आज पहाटे ५.१० वाजता अज्ञात चोरट्याने ही दुचाकी पार्किंग मधून चोरून नेली. यामाहा आरएक्‍स १०० या दुचाकी कंपनीने बंद केल्‍या आहेत. तरीही अशा सेकंड हँड गाड्यांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. दरम्‍यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कणकवली पोलीस चोरटयाचा शोध घेत आहेत