गव्यारेड्याची धडक ; दुचाकीस्वार ठार

Edited by: विनायक गांवस
Published on: January 27, 2025 10:40 AM
views 710  views

सावंतवाडी : हुमरस येथे रविवारी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान गवा रेड्याने धडक दिल्यानं दुचाकीस्वार ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना काल सकाळी घडली‌. सावंतवाडीला येत असताना दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

 जॅकी अगस्तिन आल्मेडा ( वय ६४) असं मृत व्यक्तीचे नाव असून ते कारिवडे - सावंतवाडी येथील आहेत. गव्यान दिलेल्या धडकेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हुमरसहून सावंतवाडीला येताना दुचाकीला गवा रेड्याने धडक दिल्यानं ही दुर्घटना घडली.‌ कुडाळ येथील रूग्णालयात पुढील सोपस्कार पार पडले. आज सावंतवाडी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.