दुचाकी - डंपरचा अपघात ; दोन महिला जखमी

Edited by: लवू परब
Published on: December 31, 2024 20:10 PM
views 116  views

दोडामार्ग : जुने 2024 वर्षाची आज शेवट होत आताना दोडामार्ग विजघर मार्गावर झरेबांबर येथे दुचाकी - डंपरचा अपघात झाला. या अपघातात दोन महिला जखमी झाल्यात. त्यांना उपचारासाठी येथील दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र अपघातात दुचाकीचे नुकसान झाले. कोणतीही जीवित हानी झाली नाही.

दोडामार्ग हुन साटेली भेडशी येथील सिंधुदुर्ग बँक मधील दोन महिला कर्मचारी सकाळी कामावर जात असताना झरेबांबर येथे समोर चालणाऱ्या डंपरला  दुचाकीची धडक बसली या अपघाता दोन्ही महिला किरकोळ जखमी झाल्या. त्यांना तेथील स्थानिकांनी दोडामार्ग रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डोक्यात हेल्मेट आल्याने मोठा अनर्थ टळला