कसाल इथं दुचाकीचा अपघात | मालवण येथील युवकाचा मृत्यू

एक जण गंभीर तर एक किरकोळ जखमी
Edited by: उमेश बुचडे
Published on: June 05, 2023 11:11 AM
views 1126  views

मालवण : कसाल वरून कणकवलीच्या दिशेने येत असलेल्या दुचाकीचा कसाल नदी वरील तीव्र वळणावर अपघात झाला. या अपघातात मालवण येथील एका युवकाचा मृत्यू झाला आहे. तर कुडाळ मधील एक जण  गंभीर जखमी आहे. कणकवलीतील एकाला किरकोळ दुखापत झाली असल्याचे समजत आहे. हा अपघात 5 जून रोजी मध्यरात्री 2. 30 च्या सुमारास कसाल नदी वरील तीव्र वळणावर झाला.

नेमका अपघात कसा झाला याची माहिती प्राप्त झाली नाही आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार नदीवरील तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने अपघात झाला असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्गावर जाणाऱ्या प्रवाशांनी जखमींना मदत केली तसेच पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिका बोलवत जिल्हा रुग्णालय ओरोस येथे पाठवण्यात आले.