
मंडणगड : रा.प.मंडणगड आगारामार्फत 27मार्च 20205 रोजी मंडणगड येथून विजापूर एसटी नवीन साधी जलद फेरी सुरू करण्यात आलेली आहे. ही बस मंडणगड, खेड, मिरज, कोयनानगर, पाटण ,कराड, इस्लामपूर, सांगली, मिरज, शिरबाळे, अथणी, तिकोटा, विजापूर अशा मार्गावर बस धावणार आहे.
महिलांकरता 50 टक्के ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के अमृत ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के तसेच दरातील सर्व सवलती वरील प्रमाणे नियमात महाराष्ट्र राज्य सिमेपर्यंत चालू आहेत. तरी सर्व प्रवाशांनी सदर फेरीच्या जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन मंडणगड आगार प्रमुख मदनीपाश जुनेदी यांनी केले फेरीच्या शुभारंभाचे कार्यक्रमात केले. यावेळी लिपिक टंकलेखक राकेश पाटील, वाहतूक नियंत्रक भिमसेन लोखंडे, वाहतूक नियंत्रक संतोष जाधव, चालक अजय ढगे, वाहक सिध्दार्थ भावे, अन्य कर्मचारी व प्रवाशी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.