'गाव चलो अभियान'ला वझरे गावात मोठा प्रतिसाद..!

Edited by: संदीप देसाई
Published on: February 12, 2024 14:50 PM
views 85  views

दोडामार्ग : भाजपच्या गाव चलो अभियान अंतर्गत वझरे येथे घरोघरी प्रवास आणि प्रचार करत राबविण्यात आलेल्या 'गाव चलो अभियान' अभियानाला वझरे गावात मोठा प्रतिसाद मिळाला. नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून गाव चलो अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारची यशोगाथा तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी आणि जनतेचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी भाजपने हा कार्यक्रम हाती घेतलाय. त्या अतंर्गत 'गाव चलो अभियान' वझरे दोडामार्ग बूथ क्रमांक 300 येथे झाले.  या कार्यक्रमाला वझरे गावचे सरपंच सुरेश गवस, भाजपा दोडामार्ग तालुका सरचिटणीस संजय सातार्डेकर, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, पंचायत समिती माजी उपसभापती बाळा नाईक, माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, संदीप नाईक, प्रवीण गवस, माजी युवा मोर्चा अध्यक्ष दीपक गवस, माजी शक्तिकेंद्र प्रमुख सुनील गवस, माजी शहराध्यक्ष समीर रेडकर, शाणी बोर्डेकर तसेच वझरे गावचे भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा गाव चलो अभियान याबाबत रंगनाथ गवस यांनी उपस्थित ग्रामस्थांना  सविस्तर मार्गदर्शन केल. विकास प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व जगात आपला देश महासत्ता बनविण्यासाठी सर्वांनी पंतप्रधान मोदींना साथ द्या असे आवाहन यावेळी करण्यात आले.