![](https://kokansadlive.com/uploads/article/17268_pic_20250215.1824.jpg)
सावंतवाडी : कारिवडे येथे सावंतवाडी शहराच्या प्रवेशद्वारावर आंबोली- सावंतवाडी राज्य मार्गावर भला मोठा खड्डा पडला असून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग सुशेगाद असुन याकडे दुर्लक्ष केलं आहे. याबाबतची तक्रार प्रवाशांनी केल्यानंतर त्याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून फक्त धोकादायक म्हणून फलक लावण्यात आला आहे. खड्डा बुजवण्यासाठी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सावंतवाडी-कारिवडे येथील कचरा डेपोच्यासमोरील भागात शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हा भला मोठा खड्डा आहे. त्या ठिकाणी मोरी खचल्यामुळे हा खड्डा पडला आहे. गेला आठवडाभर तो खड्डा तसाच आहे. तक्रार केल्यानंतर बांधकाम विभागाकडून त्या ठिकाणी धोकादायक म्हणून फलक लावण्यात आला. मात्र, गेले काही दिवस तो खड्डा तसाच आहे. खड्डयाची लांबी लक्षात घेता दुचाकीचे चाक थेट खड्डयात जाऊन मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तो तात्काळ बुजवावा, अशी मागणी होत आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुशेगाद पणाबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.