
चिपळूण : दाभोळ खाडीसह वाशिष्ठी नदाच्या उजव्या तीरावरील कालूस्ते-भिले खारभूमी योजनेच्या नुतनीकरणासाठी 3 कोटी 21 लाखाच्या अंदाजपत्रकास शुक्रवारी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या नुतनीकरणासाठी कालूस्ते, भिले गावातील ग्रामस्थानी आमदार शेखर निकम यांना विनंती केली होती. अखेर ही योजना अखेर मार्गी लागल्याने दोन्ही गावातील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी आमदार निकम यांना धन्यवाद दिले आहेत. जिल्हयात जलसंपदाच्या अखत्यारीत असलेल्या 170 खारभूमी योजनाध्ये या योजनेचा समावेश आहे. या योजनेचे बांधकाम पुर्ण होवून 25 वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. मात्र अलिकडे सातत्याने होणारी अतिवृष्टी, चक्रिवादळ, सततच्या येणा-या पूरामूळे बांधाची धूप होवून बांध कमकुवत झाला आहे, तसा अनेक ठिकाणी तो वाहून तर काही ठिकाणी तो दबला गेला आहे. परिणामी बांधाची उंची कमी झालेली आहे. 2021 मधील महापूरात अनेक ठीकाणी बांधावरून पाणी गेल्याने व लगतच्या खाडीमधून ब-याच प्रमाणात वाळू उपसा झाल्याने दगडी पिचिंग वाहून गेल्याने बांधाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
एकूणच दोन्ही गावातील परिसरातील विकासाच्यादृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या या योजनेमुळे दोनशेहून अधिक हेक्टर क्षेत्र हे लागवडीखाली आहे. हे क्षेत्र लागवडीखाली येणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने कालूस्ते गावातील ग्रामस्थांनी या योजनेेच्या नुतनीकरणासाठी आमदार शेखर नियमांना विनंती करून शासनाला निवेदन दिले होते. आमदार निकम यांनीही यासाठी सातत्याने प्रयत्न केले. अखेर शुक्रवारी 3 कोटी 21 लाख खर्चाच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आले. गेल्या अनेक वर्षी मागणी मान्य झाल्याने ग्रामस्थानी आमदार निकम यांचे आभार मानले आहेत.
भिले, कालूस्तेसाठी आनंदाचा दिवस
माझ्या मतदारसंघातील कालूस्ते आणि भिले ही दोन्ही गावे दाभोळखाडी व वाशिष्ठी नदीला लागूना आहेत. तेथे असलेल्या दोन्ही खारभूमी योजना या दुरूस्तीला आल्या होत्या. नादुरूस्त योजनांमुळे पावसाळयात या परिसरातील शेती पाण्याखाली जाऊन शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते. वर्षभरापूवा भिले-जांभुळवाडी योजनेला 92 लाखाचा निधी मंजूर करून ती मार्गी लागली. आता कालूस्ते-भिले ही योजनाही मार्गी लागत आहे. त्यामुळे कालुस्ते आणि भिले या दोन्ही गावासाठी हा आनंदाचा दिवस आहे.