BIG BREAKING | भर बाजारपेठेत पिस्तूल काढणारा माजी नगरसेवक होणार हद्दपार ?

रिवॉल्व्हर व दुचाकी पोलीसांनी केली जप्त
Edited by: विनायक गांवस
Published on: March 10, 2023 19:30 PM
views 240  views

सावंतवाडी : शहरात पूर्व वैमनस्यातून झालेल्या भांडणादरम्यान माजी नगरसेवकानं  स्वरक्षणाकरीता असलेली पिस्तूल भर बाजारपेठेत काढली होती. समोरील व्यक्तीन कटरचा मारा केल्यानं पिस्तूल काढल्याच त्यांच म्हणन होत. परंतु, भर बाजारात पिस्तूल काढल्यान नाराजी व्यक्त केली जात होती.

यासंदर्भात रवी जाधव यांनी हे पिस्तूल जप्त करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार माजी नगरसेवक नासीर शेख यांचे वापरलेले रिवॉल्व्हर व दुचाकी गाडी पोलीसांनी जप्त केली आहे. तसेच गुन्ह्याचा पुढील तपास सुरु असुन त्यांच्या विरुध्द हद्दपारीची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक मेंगडे यांनी रवी जाधव यांना दिली आहे.