BIG BREAKING | पाल सड्यावर भीषण आग

सुमारे १५० एकरमधील आंबा, काजू कलमे जाळून खाक
Edited by: दिपेश परब
Published on: December 28, 2022 19:35 PM
views 400  views

वेंगुर्ला : तालुक्यातील पाल येथील सड्यावर बबन मेस्त्री यांच्या मांगरा जवळ आज दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. सुमारे १५० एकरमध्ये ही आग पसरल्याने येथील आंबा व काजू जाळून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

   दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली मात्र आग सर्वत्र पसरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याबाबत ग्रामस्थांमार्फत तात्काळ वेंगुर्ला पोलिस स्टेशन ला कळविण्यात आल्यानंतर त्यांच्या मार्फत वेंगुर्ला नगरपरिषद यांना अग्निशमन बंबासाठी कळविण्यात आले परंतु या अग्निशमन बांबचा टायर पंक्चर असल्याने कुडाळ अग्निशमन दलाची मदत मागविण्यात आली. मात्र ही  टीम पोचण्यास उशीर झाला तोपर्यंत ग्रामस्थांनी आग विझविली. नंतर धुमसत असलेल्या आगीवर अग्निशमन दलने पाणी मारले. यावेळी त्याठिकाणी वेंगुर्ला पोलिस पथकही हजर झाले होते.

    ही आग गेली कित्येक वर्ष लागत आहे. ही आग विद्युत तारांच्या घर्षणाने लागत असल्याचा संशय आहे आणि म्हणून यासंबंधीची तक्रार घेऊन उद्या आपण कुडाळ विद्युत वितरण विभागाचे श्री पाटील यांची भेट घेऊन जाब विचारणार असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते कमलेश गावडे यांनी सांगितले आहे. 

    यावेळी घटनास्थळी पोलीस हवालदार सखाराम परब, संतोष दाभोलकर, ट्राफिक पोलीस अंमलदार मनोज परुळेकर, तुषार मांजरेकर यांनी तात्काळ धाव घेतली. यावेळी पाल सरपंच कावेरी कमलेश गावडे, मातोंड सरपंच जानवी जगदीश परब, पाल ग्रामस्थ विलास गावडे, दीपक गावडे, उत्तम गावडे, रवींद्र गावडे, अरुण गावडे, श्रीकांत मेस्री, बबन मेस्री, रमेश आमडोसकर, संजय पालकर मोहन गावडे, राजाराम गावडे, लवु परब, जयराम परब, जगन्नाथ गावडे, प्रसाद गावडे, तुकाराम गावडे, योगेश कोळसुलकर, प्रदीप मुळीक, संदीप नाईक,  प्रभाकर गावडे, तलाठी श्री धूमाळे, पोलिस पाटील श्री नाईक आदी उपस्थित होते.