
सावंतवाडी : तालुक्यातील सर्वात धक्कादायक निकाल म्हणजे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सासरवाडीत अर्थात नेमळेत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. भाजपच्या सरपंच पदाच्या उमेदवाराचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या दीपिका भैरे यांनी पराभव केला आहे. हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासाठी फार मोठा धक्का समजला जात आहे.