दोडामार्गात राष्ट्रवादीला मोठा धक्का ; नगरसेवक भाजपात

केंद्रीय मंत्री राणेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश !
Edited by: विनायक गावस
Published on: October 19, 2022 16:13 PM
views 340  views

दोडामार्ग : कसई- दोडामार्ग नगरपंचायतीचे राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक रामचंद्र ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 

केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते नारायण राणे यांच्या उपस्थितीत रामचंद्र ठाकूर व त्यांचे सहकारी सुशांत राऊत, संजय खांबल , करण ठाकूर यांनी भाजपात प्रवेश केला. जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर , एकनाथ नाडकर्णी , तालुकाध्यक्ष सुधीर दळवी , नगराध्यक्ष चेतन चव्हाण , नगरसेवक संतोष नानचे , संध्या प्रसादी , सोनल म्हावळणकर , शहराध्यक्ष पांडुरंग बोर्डेकर , रंगनाथ गवस , आनंद तळणकर ,अमित प्रसादी , प्रवीण गावकर , फोंडू हडीकर , लक्ष्मण आयनोडकर तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 

दोडामार्ग न.पं.च्या प्रभाग २ मधून रामचंद्र ठाकूर हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झाले होते . तर त्यापूर्वीच्या टर्ममध्ये ते प्रभाग क्रमांक १ मधून मनसेतर्फे निवडून आले होते. सध्या न.पं.मध्ये भाजपचे १४, शिवसेना २ व राष्ट्रवादी काँग्रेस १ अस बलाबल होते. मात्र , रामचंद्र ठाकूर यांच्या भाजपा पक्षप्रवेशामुळे भाजपाचे १५ नगरसेवक झाले आहेत. तर  त्यांच्या पक्षांतराने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.