भुवन दळवी राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यात दुसरा

Edited by:
Published on: April 14, 2025 18:22 PM
views 165  views

सावंतवाडी : स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील इयत्ता पाचवीत शिकणारा कु. भुवन पुंडलिक दळवी याने विझ इंटरनॅशनल स्पेल बी या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याची आता राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

भुवनच्या या यशाबद्दल स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे अध्यक्ष  रुजूल पाटणकर आणि शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले आहे. भुवनने आपल्या यशाचे श्रेय आपले शिक्षक आणि आई वडिलांना दिले आहे. भुवनला लहानपणापासूनच शब्दांची आवड आहे. तो नेहमीच नवीन शब्द शिकण्याचा प्रयत्न करतो. त्याची स्मरणशक्ती चांगली आहे, ज्यामुळे त्याला स्पेलिंग लक्षात ठेवणे सोपे जाते.भुवनला भविष्यात एक चांगला लेखक व्हायचे आहे. तो राष्ट्रीय स्पर्धेतही चांगले यश मिळवेल, असा विश्वास त्याच्या शिक्षकांनी व्यक्त केला आहे.