
वैभववाडी : आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कुसूर येथे मंजूर झालेल्या तीन रस्त्याचे आज आ.राणे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. गावातील मुख्य रस्त्याचाही विषय लवकरच मार्गी लावला जाईल असे आश्वासन आ. राणे यांनी गावकऱ्यांना दिले.
कुसूर गावातील वैभववाडी उंबर्डे मुख्य रस्ता ते टेंबवाडी, कुसूर खडकवाडी शाळा ते श्री रामेश्वर दारुबाई मंदिर, तिरवडे मुख्य रस्ता ते सुतारवाडी या तिन्ही रस्त्याच्या डांबरीकरणासाठी आ.राणे यांनी निधी मंजूर केला. या कामांची आज भूमिपूजन झालीत. आ.राणे यांचं ग्रामपंचायतीत सरपंच शिल्पा पाटील यांनी स्वागत केले. गावातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. तसेच गावातील मुख्य रस्त्याच्या कामाचाही विषय मार्गी लावला जाईल असे आश्वासन आ.राणे यांनी दिले. यावेळी तालुका अध्यक्ष नासीर काझी, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, राजेंद्र राणे, प्राची तावडे, नेहा माईणकर, उपसरपंच प्रकाश झगडे, पुंडलिक पाटील, तात्या पाटील, धाकू पाटील, गजानन पाटील, महेश रावराणे, जनार्दन साळुंखे, रविंद्र साळुंखे, प्रदीप पाटील, गोपाळ जाधव, प्रशांत साळुंखे, उदय पांचाळ, मेघा पांचाळ, मुरारी साळुंखे यासह ग्रामस्थ उपस्थित होते.