
वेंगुर्ला : तालुक्यातील निसर्गरम्य अशा अणसुर गावातील निळगावडेवाडी येथे सुमारे २०० फूट डोंगराच्या मध्यावर असलेल्या श्री देव काळोबा मंदिराचा भूमिपूजन सोहळा शनिवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता करण्यात येणार आहे.
निसर्गाचा वरदहस्त असलेला हा अणसूर गाव. या गावातील निळगावडेवाडी येथे हे श्री देव काळोबा मंदिर आहे. रक्षणकर्ता, राखणदार व संकटकाळी हाकेला धावणारा व नवसाला पावणारा म्हणून या देवाची ख्याती सर्वदूर पसरली आहे.
सुमारे २०० फूट डोंगरातुन मंदिराच्या पश्चिमेस पायथ्याशी बरमाही वाहणारा पिण्याच्या पाण्याचा झरा येथील नागरिकांसोबतच इतर हजारो जीवांची तृषाशांत करतो. या श्री देव काळोबाच्या जुन्या देवालयाचे रूपांतर आता भव्य अशा मंदिरात होत आहे. आणि याचाच भूमिपूजन सोहळा २५ नोव्हेंबर रोजी होत आहे. तरी या कार्यक्रमास सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री देव काळोबा प्रासादिक मंडळ, मुंबई (विश्वस्त न्यास) व निळगावडेवाडीतील ग्रामस्थांनी केले आहे.