कणकवली ग्रामपंचायत काळापासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कामाचे आज भूमिपूजन

कणकवली रवळनाथ मंदिर ते मनोहर राणे घरापर्यंत रस्त्याचे भूमिपूजन झाल्याने ग्रामस्थांनी केली समाधान व्यक्त
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 09, 2023 15:54 PM
views 160  views

कणकवली : कणकवली ग्रामपंचायत निर्मितीपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले. कणकवली शहरातील रवळनाथ मंदिर ते मनोर राणे यांच्या घरापर्यंत जाण्याचा रस्त्याला मंजुरी मिळाली असून आज या कामाचे भूमिपूजन  पुंडलिक राणे यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी प्रमुख उपस्थिती नगराध्यक्ष समीर नलावडे उपनगराध्यक्ष बंडू  हर्णे व नगरसेवक उपस्थित होते. कणकवली शहर हे विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे त्यामुळेच कणकवली शहरात नागरिकांच्या मूलभूत सुविधा पुरवण्याकडे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी भर दिला त्यामध्ये रस्ते बनवण्याचे काम प्रथम हाती घेण्यात आले आहे.

कणकवली ग्रामपंचायत काळापासून वेगवेगळ्या कारणांमुळे प्रलंबित असलेल्या रस्त्याचे भूमिपूजन आज करण्यात आले त्यामुळे फौजदारवाडीतील नागरिकांनी समाधान व्यक्त करत ग्रामस्थांच्या वतीने नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे  यांचा सत्कार देखील ग्रामस्थांनी केला. यावेळी नगरसेविका कविता राणे, नगरसेविका उर्मी जाधव ,किशोर राणे,चारुदत्त साटम ,महेश सावंत ,मनोहर राणे, पुंडलिक राणे, महेश दळवी, श्रीकांत दळवी,नवनीत बागवे, महादेव चिकोडी, संतोष राणे, विजय राणे, महेश राणे, सदा राणे, जितेंद्र राणे, अनंत राणे ,रोहन राणे उपस्थित होते.