तुळसमध्ये केसरकरांच्या माध्यमातून मंजूर विकासमांची भूमिपूजनं संपन्न

Edited by: दिपेश परब
Published on: March 05, 2024 16:08 PM
views 328  views

वेंगुर्ले : शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी वेंगुर्ला विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून तुळस गावातील सुमारे ५७ लाखांच्या विकासकामांची भूमिपूजन शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते करण्यात आली. 

तुळस गावातील सुमारे ५७ लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले. सर्वप्रथम येथील ग्रामदैवत श्री देव जैतीरला पुष्पहार व श्रीफळ अर्पण करून या भूमिपूजन समारंभाला सुरुवात करण्यात आली. यावेळी  शिवसेना जिल्हा समन्वयक तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, तालुका संघटक बाळा दळवी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, विभाग प्रमुख संजय परब, तुळस माजी सरपंच आपा परब, दिलीप परब, तुळस ग्रा प सदस्य जयवंत तुळसकर, नारायण कुंभार,  सामाजिक कार्यकर्ते नाना राऊळ, सचिन परुळकर, महेश राऊळ, सागर सावंत, विवेक तिरोडकर यांच्यासहित ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वप्रथम श्री देव वेताळ मंदिर येथील वेताळ प्रतिष्ठान संस्कृतीक भवन या सुमारे १२ लाखांच्या विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी श्री देव वेताळ चरणी पुष्पहार व श्रीफळ अर्पण करण्यात आला.

यानंतर सुमारे ५ लाख रुपये किमतीच्या सावंतवाडी मुख्य रस्ता ते सावंत घर गाळव रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, सुमारे १० लाख रुपये किमतीच्या तुळस आरोग्य केंद्र ते आजगिणे रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, सुमारे १५ लाख रुपये किमतीच्या तुळस आरोग्य केंद्र ते वाघेरीकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, सुमारे ५ लाख रुपये किमतीच्या  लिंगदांडा गणपती मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, सुमारे ५ लाख रुपये किमतीच्या शिवाजी हायस्कुल ते गवंडेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे अशा सुमारे ५७ लाखांच्या विकासमांची भूमिपूजन करण्यात आली. तुळस गावासाठी हा भरगोस निधी दिल्या बद्दल ग्रामस्थांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आभार व्यक्त केले.