
सावंतवाडी : येथील भोसले नॉलेज सिटी या शैक्षणिक संकुलाच्या स्थापनेला उद्या गुरुवार ६ जून रोजी दहा वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त संस्थेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२०१४ साली सुरु झालेल्या या संस्थेत पॉलिटेक्निक व डिग्री इंजिनिअरिंग, एम.फार्मसी, बी.फार्मसी, डी.फार्मसी, तसेच सीबीएसई इंटरनॅशनल स्कूल यासारखे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. संस्थेतून व्यावसायिक शिक्षण घेऊन बाहेर पडलेले शेकडो विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. केवळ मोठया शहरांमध्ये उपलब्ध असणाऱ्या अत्याधुनिक शैक्षणिक सोयी सुविधा संस्थेने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.संस्थेच्या वाटचालीत जिल्हावासियांचा देखील मोठा वाटा आहे. त्यामुळे संस्थेने उद्या सायंकाळी चार ते आठ या वेळेत आयोजित केलेल्या दहाव्या वर्धापन दिन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी केले आहे.