भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड

Edited by: विनायक गांवस
Published on: May 21, 2024 06:03 AM
views 75  views

सावंतवाडी : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची इन्फिप्री आयटी सोल्युशन्स, गोवा व अन्नपूर्णा टेक रिसोर्स, उद्यमनगर माजगाव या कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड करण्यात आली आहे. कॉलेजच्या डिप्लोमा विभागातील तृतीय वर्ष कॉम्प्युटर शाखेच्या विद्यार्थ्यांचे कॅॅम्पस इंटरव्हयू या दोन्ही कंपन्यांतर्फे घेण्यात आले होते. यामध्ये इन्फिप्री आय टी सोल्युशन्स, गोवा या कंपनीमध्ये ४ विद्यार्थ्यांची माहिती तंत्रज्ञान सहाय्यक अभियंता व ५ विद्यार्थ्यांची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करण्यात आली. तसेच अन्नपूर्णा टेक रिसोर्स, उद्यमनगर, माजगाव या कंपनीमध्ये ४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

सध्या आयटी क्षेत्र झपाट्याने विस्तारत असून आता पुणे-मुंबई सोबतच गोवा व स्थानिक पातळीवर देखील मोठ्या प्रमाणावर संगणक अभियंत्यांची आवश्यकता भासत आहे. या अनुषंगाने कॉलेजने विविध आयटी उद्योगांशी सामंजस्य करार केलेले असून त्यामधून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत असल्याचे कॉलेजचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा.मिलिंद देसाई यांनी सांगितले. यावेळी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, प्राचार्य डॉ.रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले व विभाग प्रमुख प्रा.प्रशांत काटे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.